प्रतिनिधी
केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महापुर आल्याने केरळमध्ये सर्वाधिक हानी झाली आहे. तेथील जनजीवन विस्कळित झाले आहे. मुसळधार पाऊस आणि महापुरात आतापर्यंत 334, जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण आठ हजार कोटीहून अधिक नुकसान झाले आहे. हजारो नागरिक पुरात अडकले आहेत.अडीच लाखांवर नागरिक अक्षरशः बेघर झाले आहेत.
या दुदैवी प्रसंगात आम्ही सर्व भांडुपकर आमच्या बांधवांसोबत आहोत.
भांडुप मधील जनतेला आम्ही नम्र पणे आवाहन करतो की, कपडे, खाद्य पदार्थ, धान्य, ब्लँकेट,चादर, साधनसामुग्री, औषधसाठा, आर्थिक मदत, अत्यावश्यक बाबींचा विचार करून जे जे शक्य होईल ती योग्यती यथाशक्ती मदत करण्याचे मौलिक कामगिरी आपण सर्वांनी पार पाडून आपल्या भारतीय बांधवांना मदतीचा हात पुढे क रुया असे आवाहन किर्तीभाई शहा यांनी केले आहे.
