वसई पोलीस पथकास मिळालेल्या विश्वसनीय माहिती वरून विरार पोलीस ठाणे हद्दीत मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार फाटा येथे एक इसम नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एल्को- १ गोळ्याची विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी मिळाल्यावरूनस्थानिक गुन्हे शाखा वसई पोलीस पथकाने विरार फाटा येथे सापळा रचून एका व्याक्तीला ताब्यात घेऊन ७,२५,०००/- किंमतीच्या एल्को - १ या गोळ्या हस्तगत केल्या.अधिक चौकशी केल्यानंतर आणखी दोन व्याक्तीना अटक केली पुढील चौकशी स्थानिक गुन्हे शाखा वसई युनिट करत आहे.
