बातमीपत्र

भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र. ५२ च्या वतीने नगरसेविका प्रीती सातम यांनी गोरेगाव पूर्व आरे मिल्क कॉलनी, युनिट क्र. ०५, मार्केट जवळ जाहिर सभेचे आयोजन करण्यात आल होत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई शहरातील झाेपडपट्टी वासियांसाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले असून २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचा संकल्प केला आहे, या सर्वांची जनतेला माहिती देण्यासाठी सभेच आयोजन केले होते. मुंबई भाजपचे अध्यक्ष, आमदार आशीष शेलार हे विविध ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या २०११ साला पर्यंतच्या झोपडपट्टीना संरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुंबईत विविध ठिकाणी सभा घेत आहेत. शेलार यांनी झोपडपट्टीना संरक्षण देण्याबाबत आरे कॉलनीत सविस्तर माहिती नागरिकांसह आदिवासी बांधवांना दिली. या सभेला मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार, आमदार-जिल्हा अध्यक्ष उत्तर पश्चिम जिल्हा अमित साटम, नगरसेविका प्रीती साटम उपस्थित होते. या सभेला कार्यकर्त्यांसह नागरिक हजाराेच्या संख्येने उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा