बातमीपत्र

मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळाच्या वतीने भव्य निशुल्क रोगनिदान व मतदान कार्ड शिबीर सोबत भाव भक्ती गीत कार्यक्रम संपन्न

 विधायक व सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाचे दहा दिवस विविध स्पर्धा, आरोग्य शिबीरे, गीत संगीत आदी सामाजीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
  त्याअंतर्गत मंगळवार, 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 ते 7  डॉक्टर सौ सपना नितीन राठी डॉक्टर सौ पूजा निलेश राठी भव्य होमीओपॅथीक व आयुर्वेदीक रोगनिदान शिबीर  चे आयोजन करण्यात आले सदर शिबिरात १५० पेक्षा अधिक गरजू रुग्णांना मोफत तपासणी करून औषधीचे वितरण करण्यात आले.  सदर शिबिर चालू असताना आढळलेल्या काही रुग्णांना ज्यांचे उपचार वाशीम येथे होत नाही असे त्या रुग्णांना लागणारी उच्चस्तरीय रुग्ण सेवेसाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात येणार आहे. 
तसेच बुधवार, 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 4 वाजता भव्य मतदाता नोंदणी शिबीर घेण्यात आले सदर शिबिरामध्ये  मंत्री पार्क, ड्रीमलैंड सिटी, अलाडा प्लॉट, सिंधी कॅम्प, खामगाव जीन, संतोषी माता नगर, अकोला नाका, पाटणी चौक, जुना रिसोड नाका या परिसरात राहणाऱ्या तब्बल 170 मतदाताची नवीन नोंद घेण्यात आली व तसेच सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यत वाशिम चे सुप्रसिद्ध गायक प्रा. अनिल सोनुने व प्रा. प्रवीण जोशी आणी संच यांच्यावतीने स्वर-नाद प्रस्तुत भक्ती भाव संगीत कार्यक्रमाला लोकांनी भरपूर उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाचा आनंद घेतला. भाव भक्ती संगीत कार्यक्रमाध्ये प्रस्तुत करण्यात आलेले सर्व देवाची भजनी, गाने, आरत्या, गवळण, पोवाडे या सगळ्यांनी उपस्थित  गणेश भक्तांचे मन वेधून घेतले  संपूर्ण परिसर हा भाव भक्तिमय झाला होता।
गुरुवार 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यत जय बजरंग ढोल ताशा ध्वज पथक कार्यक्रमाला लोकांनी तुफान गर्दी केली. ढोल आणि ताशाच्या चालीवर सर्व गणेश भक्त धूम नाचले लहान मुलांसोबत मोठ्यांचे पण पाय थिरकली.
शुक्रवार 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यत  अंध मुलांसाठी मदतीची हाक या कार्यक्रमा अंतर्गत केकतउमरा वाशिम येथील सुप्रसिद्ध गायक चेतन उचितकर आणी संच चेतन सेवांकुर ऑर्केस्ट्रा ग्रुपचे कार्यक्रम घेण्यात येत आहे वाशीमच्या जनतेला आव्हान आहे की ह्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमा दरम्यान आपल्याकडंने जे काही होईल फुल ना फुलाची पाकळी अशी मदत या अंध मुलांना करण्यात यावी असे आव्हान मंत्री पार्क गणेश उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही भव्य व आकर्षक गणेश मुर्तीची स्थापना करण्यात आली असून यासोबतच गणेशमुर्तीच्या आजुबाजुने भव्य दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. दहा दिवस सकाळ सायंकाळ अभिषेक, पुजा, आरतीला परिसरातील असंख्य भाविक भक्त व महिला भगिनी मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. आरती झाल्यानंतर भाविक भक्तांना प्रसादाचे वितरण करण्यात येत आहे. परिससरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून याठिकाणी दररोज आयोजीत विविध स्पर्धा व कार्यक्रमाला शहरातील भाविक भक्त आवर्जुन हजेरी लावून गणेशमुर्तीचे दर्शन घेत आहेत.दहा दिवस आयोजीत विविध सामाजीक व धार्मिक कार्यक्रम, शिबीरे, स्पर्धा आदींच्या यशस्वीतेसाठी मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत.

Follow Us On Social Media 
Web Site : -  www.livemaharashtra.com 
Download LIve Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!


आमच्यात सामील व्हा