बातमीपत्र

भिषण अपघात वाशिमच्या सहा जणांचा जागीच मृत्यू एक गंभीर जखमी

वाशिम दि.२१:(अजय ढवळे)
हिंगोली तालुक्यातील कलगाव जवळ अन्नपूर्णा शाळेच्या वाशिम रोडवर  रात्री दोनच्या दरम्यान दोन वाहणाचा सामोरा समोर अपघात होऊन वाशिम जिल्ह्यातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे
रात्री दोनच्या दरम्यान ची घटना घडली असून दोन गाडीचा समोरा समोर धडकेत ६ ठार तर एक चालक जखमी असल्याची कळते,या भीषण अपघाता मध्ये वाशिम जिल्ह्यातील सहा जणांचा जाग्यावरच मुत्यू झाला.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक मारुती थोरात,पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, सहायक पोलीस निरीक्षक मगन पवार यांनी तात्काळ मयताना सामान्य हिंगोली येथे रुग्णालय हालविण्यात आले असून जखमी वर नांदेड येथे उपचार सुरू आहे,यामध्ये अपघातातील ओळख पटली त्याचे नाव गणेश लक्ष्मण हजारे, नरसिंह सोपान हजारे, सतिश नारायण मुरकुटे, राजू विष्णू धामणे, अनिल गजानन चव्हाण आणि स्वप्नील राम इरतकर अशी मृतांची नावे आहेत. जखमींची नावे मदन जयाजी चव्हाण, सखाराम जिजीबा जाधव (रा. सुरकुंडी, ता. जिल्हा वाशिम), अशी आहेत.
  जीप (एमएच ३७ व्ही २४४४ ) ला भरधाव ट्रकने (एचआर ६९ ए ६८५५ ) भीषण धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की जीप पूर्णत: क्षतिग्रस्त झाली.सकाराम जाधव अशी असून या सहाजना मध्ये दोन हाजारे कुटुंबाची सदस्य आहेत तर चार मित्र आहेत अशी माहिती पुढे आली आहे.

Follow Us On Social Media 
Web Site : -  www.livemaharashtra.com 
Download LIve Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा