बातमीपत्र

जी/दक्षिण विभागात मलेरिया व डेंग्यू नियंत्रण करण्यात यश मिळवल्या बद्दल अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव

सन 2018 मध्ये 24 वॉर्ड पैकी जी/दक्षिण विभाग कार्यालयातील स. नि. निरीक्षक आणि त्यांचे स. नि. अनवेक्षक तसेच कीटक नाशक विभागातील क. अवेक्षक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन मलेरिया आणि डेंग्यू नियंत्रण करण्यात यश मिळवले. त्याबद्दल मान. आयुक्त यांनी त्यांचे कौतुक केले.तसेच जी/दक्षिण विभागाचे मान.सहायक  आयुक्त. श्री. देवेंद्र जैन साहेबांनी सर्व अधिकारी व सह कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र पत्र देवून जी/दक्षिण विभागातील सर्व विभागातील अधिकारी वर्गा समोर मंगळवारी दिनांक 09.10.2018 रोजी साप्ताहिक मीटिंग मध्ये सर्वांना आमंत्रित करून सन्मानित केले त्या बद्दल श्री. देवेंद्र जी जैन साहेब यांचे आभार. डॉ. देवेंद्र जी गोल्ल्हार साहेब MOH. आणि डॉ. हर्षल वाघ. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि कीटक नियंत्रण अधिकारी यांचाही या यशात मोलाचा वाटा आहे.यांचे योग्य मार्गदर्शन या सर्वांना मिळाले.या कामगिरीबद्दल सर्वच थरातून व TMU तर्फे अभिनंदन करण्यात आले. 


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा