परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील तहशील कार्यालयावर सरकारच्या विरोधात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दिनांक १ मार्च २०१९ रोजी एक समिती नेमून पदाचा गैरफायदा घेऊन धनगर समाजाला आदिवासी समाजासार्ख्या सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला.याचा निषेध म्हणून जिंतूर तालुक्यात आदिवासी समाजाच्या वतीने जिंतूर तहशील कार्यालयांवर एक दिवसीय धरणे आंदोलन करून निषेध करण्यात आला.या आंदोलनात आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
