लोणार शहरापासून ४ कि.मी. अंतरावर असलेल्या पिंपळखुटा येथे ११ मार्च रोजी सिलेंडरचा स्फोट होऊन सात वर्षीय व चार वर्षीय भाऊ - बहिणीचा मृत्यू झाला होता तसेच घरातील पूर्ण सामान जळून खाक झाले होते.यावेळी घरातील सदस्य सत्यभामाबाई प्रकाश घनवट (५५) व प्रेरणा माधव रसाळ (२६) ह्या घरात नसल्यामुळे वाचल्या त्यांच्या अंगावरील कपडे सोडून त्यांच्या संसार सामानासह घराची राख झाली आधीच परिस्थिती हलाखीची असतांना संपूर्ण घर जळून खाक झाल्याने पुन्हा माय लेकीला शून्यातून जगणे सुरू करावे लागणार नारीची व्यथा नारीच समजणार याचा प्रत्यय १२ मार्च रोजी आला प्रकृती खालावल्यामुळे सत्यभामा घनवट व प्रेरणा रसाळ यांना लोणार येथील डॉ. मानधने यांच्या क्लिनिक मध्ये उपचारासाठी दाखल केले असता लोणार येथील जैन सहेली सोशल ग्रुपने भेट देऊन सांत्वन केले,मदत देवू केली. यावेळी जैन सहेली सोशल ग्रुप कडून घरगुती सामान, भांडे,किराणा सामान, साडी, डब्बे, चादर, बेडसीट आदी उपयोगी वस्तू देण्यात आल्या. ग्रुपच्या अध्यक्षा सौ श्वेता सिंगी यांनी मदत नावाची बी. सी. सुरू केलेली आहे. या माहेवारी बी सी च्या जमलेल्या रक्कमेतून गरजूंना मदत केली जाते तसेच आपदग्रस्त महीला प्रेरणा रसाळ यांना आयुष्यभर उदर निर्वाह करता यावा म्हणून लवकर जैन सहेली ग्रुप कडून शिलाई मशीन देण्यात येणार आहे. यावेळी सौ. श्वेता सिंगी, सौ. नंदा संचेती, सौ. स्मिता रांका, सौ. राखी रेदासनी, सौ. प्रिया लूनिया, सौ. सपना गेलडा, सौ. पूनम रूनवाल, सौ. प्रीती संचेती, सौ. स्वाती बैरागी, सौ. सारिका रेदासनी, डॉ. सौ रेखा संचेती आदी उपस्थित होत्या.
