बातमीपत्र

Live महाराष्ट्र न्युज चॅनेलचे महाराष्ट्र सह- संपादक बाबाराव मुंडे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई या संघाच्या लोणार तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

लोणार तालुक्यातील खळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध असलेले तसेच सदैव सामाजिक,धार्मिक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचा नेहमी सहभाग व रोखठोक पत्रकार म्हणून ज्यांची ख्याती आहे असे बाबारावजी मुंढे पत्रकारिता क्षेत्रातील असलेली पकड पाहून त्यांच्या कार्याची दाखल घेऊन त्यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या लोणार तालुका अध्यक्षपदी निवडकरण्यात आली.सदरील निवड हि पत्रकारांच्या समस्यां मांडण्यासाठी व पत्रकारांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी तसेच पत्रकार संघाचे कार्य वृंधिगत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष लहाने यांनी एका कार्यक्रमाद्वारे नियुक्ती केली.यावेळी प्रा. हिवाळे सर,भगवान नालेगावकर,प्रा.दर्शन गवई,सचिन खंडागळे,फकिरा पठाण,अशोक इंगळे,गजानन इंगळे हे सर्व मान्यवर उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा