परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील वरुड येथे जिल्हापरिषद शाळेत पहिली ते आठवी अशी आठ वर्ग आहेत .या शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड यातना भोगाव्या लागत आहेत .स्थानिक ग्रामपंचायत कडून मागील दोन वर्षापूर्वीच चौदाव्या वित्त आयोगा अंतर्गत जल शुद्धीकरण यंत्रासाठी अंदाजे ७५००० हजाराचा निधी देण्यात आला.या प्रक्रियेस दोन वर्ष उलटले असून आद्यापही विद्यार्थ्याना शाळेत शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही.शुद्ध पाण्यावीणा विद्यार्थ्याचच्या आरोग्याचा प्रश्न मात्र येरणीवर आहे तहान भागवण्यासाठी शाळेतील विद्यार्थी स्वतः च्या घरून बॉटल मधे पाणी आणत आहेत त्यामुळे शाळा प्रशासन शाळेतील विद्यार्थीची एक प्रकारची चेष्टाच करीत आसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.ही सर्वं माहिती आमच्या व ईतर प्रतिनिधीना समजली आसता प्रतिनिधीनी शाळेवर प्रत्यक्ष भेट दिली विद्यार्थ्याना याबाबत विचारणा केली आसता मुलांनी मात्र आपली आर्त व्यथा केमेऱ्या समोर मांडली.संबधित प्रशासन यावर काय कार्यवाही करते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
