बातमीपत्र

बीड चकलांब्यात पंकजाताईंनी कार्यकर्त्याच्या घरी घेतला भाजी-भाकरीचा अस्वाद

बीड : प्रतिनिधी
खा.प्रीतमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ पंकजाताई यांच्या जिल्हाभरात झंझावाती सभा सुरू आहेत. त्यांच्या सभांना विक्रमी गर्दी होत असून लोकनेते मुंडे साहेबांप्रमाणेच त्यांच्या लेकींचे जागोजाग स्वागत आणि आदर तिथ्य होत आहे. गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे रविवारी प्रचार सभेसाठी गेल्यानंतर ना. पंकजाताई मुंडे, ना. महादेव जानकर यांनी कार्यकर्त्यांच्या घरी भाजी- भाकरीचा आस्वाद घेतला. लोकनेते मुंडे साहेब देखील प्रचारादरम्यान एखाद्या गावात गेल्यानंतर सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी भाजी- भाकरी खात असत. साहेबांप्रमाणेच पंकजाताई यांनी कार्यकर्त्याच्या घरी जाऊन भाजी भाकरीचा आस्वाद घेतला. यावेळी कार्यकर्त्यांना साहेबांच्या आठवणींनी गहिवरून आले.     
       ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे भाजपच्या स्टार प्रचारक असून महाराष्ट्रात त्यांच्या सभा होत आहेत. बीडमध्ये लहान बहीण प्रीतमताई मुंडे यांना पुन्हा विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी बीड जिल्ह्यात सध्या पंकजाताई यांच्या सभांचा झंझावात सुरू आहे.  रविवारी पंकजाताई यांच्या गेवराई तालुक्यात सभा झाल्या. सभेसाठी चकलांबा येथे आल्यानंतर कार्यकर्त्याच्या घरी जाऊन पंकजाताई आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, परमेश्वर महाराज वाघमोडे यांनी जमिनीवर बसून भाजी- भाकरीचा आस्वाद घेतला. जेवण करत असताना कार्यकर्त्यांशी हितगुज साधले. प्रचारासाठी जिल्हाभरात फिरत असताना पंकजाताई यांना लोकनेते मुंडे साहेबांप्रमाणेच कार्यकर्ते आणि सामान्य जनतेचे प्रेम व माया मिळत आहे. लोकनेते साहेबांच्या आठवणींना उजाळा देताना कार्यकर्ते गहिवरून जातात. लोकनेते मुंडे साहेब यांच्या विचारांचा वारसा घेऊन विकासाचे राजकारण करताना साहेबांप्रमाणेच पंकजाताई आणि प्रीतमताई यांनी तळागाळातील माणसाशी नाते जपले आहे. यामुळे साहेबांसारखेच जनतेचे प्रेम आणि माया मुंडे भगिनींना मिळत आहे.
     सर्व जाती- धर्मातील लोकांचा विकासाच्या राजकारणाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून आत्मविश्वास गमावलेल्या विरोधकांना खालच्या स्तरावर जाऊन जाती- पतीचे राजकारण करावे लागत आहे. या पूर्वीच्या निवडणुकीतही विरोधकांनी जातीयवाद पसरवून वातावरण तापवले मात्र बीड जिल्ह्यातील जनतेने कधीच जाती- पातीच्या राजकारणाला थारा  दिला नाही. याचीच प्रचिती या निवडणुकीत येत असून मुंडे भगिनींना सर्व जाती धर्मातील लोकांचे मिळत असलेले प्रेम पाहता प्रीतमताई मुंडे पुन्हा एकदा विक्रमादित्य खासदार बनणार आहेत.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा