बातमीपत्र

उद्धव ठाकरेंच्या या निर्णयामुळे शिवसैनिक खुश

आज मुंबईत शिवसेनाभवनात पार पडलेल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे.शिवसेनेच्या या महत्वपुर्ण बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले होते.काय निर्णय होतो या कडे देखील राज्यातील शिवसैनिक मोठ्या उत्सकुतेने पहात होते.अखेर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्यास दादा भुसे यांनी अनुमोदन दिले.हा भाग व प्रक्रिया जरी नियमानुसार झाली असली तरी शिवसेनेत पक्षप्रमुख घेतील तोच निर्णय अंतिम असतो.त्यामुळेच एकनाथ शिंदे याचं नाव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच निश्चित केले आहे.राज्यात युती चे सरकार स्थापन होईल हे गेल्या २४ तासात भाजप सेनेच्या बदलत्या सुरा मधून अधोरेखित होते.

भाजप कडून शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देण्यात आले तर त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याच नावाचा पर्याय पुढे येऊ शकतो त्यासाठी एकनाथ शिंदे यांची आजची निवडही महत्वाची ठरते.आदित्य ठाकरे हे पहिल्यांदा विधानसभेत गेले आहेत त्यांना विधिमंडळाच्या कामकाजाचा अनुभव नसल्याने व विधानसभा सभागृहात पक्षांच्या आमदारांना सांभाळण्याची मोठी जवाबदारी,त्यांच्या कामकाजावर लक्ष देणे या बाबींचा विचार करूनच एकनाथ शिंदे यांच्या नावाची आज घोषणा झाली असावी.या घोषणेचे शिवसेनेतून स्वागत करण्यात आले असून एका निष्ठांवाण शिवसैनिकाचा सन्मान असल्याच्या प्रतिक्रिया शिवसैनिकात उमटत आहेत.एकनाथ शिंदे यांच्या निवडीने शिवसैनिकात चैतन्य निर्माण झाले आहे.


आमच्यात सामील व्हा