राधानगरी विधानसभा मतदार संघात जशी तरुण चेहऱ्यांची विधानसभा निवडणूक लढण्यासाठी भाऊगद्दी आहे .तशी भुदरगड तालुक्यात दादा नावाच्या युवा नेत्यांची चर्चा जोरात सुरू आहे.यामध्ये प्रामुख्याने तिरवडे गावचे माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे पुत्र सत्यजितदादा जाधव, गारगोटी गावचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे पुत्र राहुलदादा देसाई ,कुर गावचे माजी जी प सदस्य पी डी पाटील यांचे पुत्र जी प सदस्य जीवनदादा पाटील यांचा समावेश आहे.सध्या या राधानगरी विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवसेनेचे प्रकाश अबीटकर आहेत . इच्छुकांची भाऊगरद्दी असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेत आला आहे .माजी आमदार के पी पाटील ,मनसेचे राज्य उपाध्यक्ष युवराज यडुरे,राधानगरी तालुक्यातून राष्ट्वादी जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील ,गोकुळ संचालक अरुण डोगले ,उधोगपती चंद्रकांतदादा पाटील कौलवकर आदी विधानसभा लढण्याची जोरदार तयारी करत आहेत .भुदरगड मधून वंचित बहुजन आघाडी कडे जी प सदस्य जीवनदादा पाटील यांनी उमेदवारी मागणी केली आहे .भाजप कडे माजी जी प सदस्य राहुलदादा देसाई प्रमुख दावेदार आहेत.कॉग्रेस कडे माजी उपसभापती सत्यजितदादा जाधव उमेदवारी मागत आहेत. भुदरगड मध्ये या तीन दादांच्यात विधानसभेला कोण विजयाला गवसणी घाऊन आमदार होते हे निवडणूक पाहणे गरजेचे आहे .
सोशलमीडियावर या 3 दादांच्या कार्यकर्त्यांनी भावी आमदार म्हणून पोस्ट टाकण्यास सुरवात केली आहे .आकुर्डे जी प मतदार संघाचे सदस्य जीवनदादा पाटील यांनी जी प मतदार संघात 7 कोटी फंड आणून विकास कसा करायचा याचे जणू रोल मॉडेलच जनतेसमोर उभे केले आहे.सोशल मिडियावर त्यांनी आपली प्रचंड क्रेझ निर्माण केली आहे .ही क्रेझ युवकांच्या पसंतीस पडत आहे .गेली 2 वर्ष ते राधानगरी ,भुदरगड ,आजरा तालुक्यात त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे .यातच वंचित बहुजन आघडीच्या पहिल्या यादीत जी प सदस्य जीवनदादा पाटील यांचे नाव आघाडीवर आहे .यामुळे राधानगरी विधानसभा मतदार संघातील पारंपरिक मते ही बाजुला जाण्याची दाट शक्यता असल्याने ते विजयापासून राधानगरी मतदार संघात कोणाला वंचित ठेवणार हे पाहणे उत्सुक्याचे ठरणार असल्याने भुदरगड मध्ये दादा नांवाच्या नेत्यांची विधानसभा निवडणुकीत जोरदार चर्चा सुरू आहे.
