बातमीपत्र

 माझी उमेदवारी राधानगरी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या दरबारात आहे - अरुण डोंगळे

माझी उमेदवारी राधानगरी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या दरबारात आहे जनतेच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवणारच आता थांबणार नाही असा निर्धार गोकुळचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अरुण डोंगळे यांनी केले. अर्जुनवाडा  (ता  राधानगरी)  येथे अरुण डोंगळे गटाच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे होते.
        डोंगळे म्हणाले राधानगरी तालुक्यातील सर्वसामान्य माणसे मोठी करण्यात आपल्या तीन पिढ्यांनी अव्याहत काम केले आहे माझ्या आयुष्यातील ही विधानसभा पहिली आणि शेवटची आहे राधानगरीच्या युवकांना वीस वर्षात तालुक्यातील आमदार माहिती नाही त्यामुळे जनतेने राधानगरीचा आमदार म्हणून मला निवडून द्यावे भुदरगड ने आमची उतराई करावी असे सांगताना ते म्हणाले तालुक्यात माजी आमदार यांच्यापेक्षा भावी आमदारांची यादी मोठी आहे काँग्रेस पक्षाने न्याय दिला नाही तर सर्व पर्याय खुले आहेत सर्व इच्छुकांनी राधानगरी तालुक्याच्या स्वाभिमानासाठी मला साथ द्यावी.
          गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे म्हणाले अरुण डोंगळे पंचवीस वर्षे राजकारणासह समाजकारण करत आहेत जिल्ह्यामध्ये दुधाचा व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची त्यांची मागणी आहे परंतु मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला नाही आला तर डोंगळे निवडणूक लढविणार यासाठी त्यांना आजरा तालुक्यातून आमचा पाठिंबा राहणार आहे.
    सुरेश कुराडे म्हणाले राधानगरी चा भाऊ आमदार होऊ दे म्हणून मतदारसंघातील महिलांनी गर्दी केली आहे त्यामुळे डोंगळे हे या निवडणुकीत नक्की यशस्वी होतील.यावेळी राजश्री डोंगळे  माजी अध्यक्ष संजयसिंह पाटील  बी  के कांबळे शामराव देसाई  यांनी मनोगते मांडली प्रास्ताविक दत्ता पाटील यांनी केले स्वागत  बी आर पाटील यांनी केले तर उद्घाटन गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्या हस्ते  प्रचाराचा नारळ  फोडण्यात आला.यावेळी गोकुळचे संचालक पी.डी.धुंदरे,कृष्णराव किरूळकर,विश्वनाथ पाटील,ए.डी.चौगुले सचिन घोरपडे,कृष्णराव पाटील,अभिषेक डोंगळे,धिरज डोंगळे,बी.जी.खांडेकर,राजू साठे पांडुरंग भांदीगरे,दिनकरराव कांबळे,सुधाकर साळोखे,वैभव,तहसीलदार साधना पाटील,चंद्रकांत पाटील हिंदुराव चौगुले,जयसिंग खामकर,जयवंत कांबळे,रमेश बचाटे,शहाजी कुराडे उपस्थित होते आभार सुशील पाटील यांनी मानले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा