बातमीपत्र

14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने जिल्हा क्रीडाधिकारी गोंदिया च्या वतीने आयोजित शालेय क्रीडास्पर्धेतजिल्हा स्तरीय खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला

नवेगावबांध -गोंदिया जिल्ह्यातील, अर्जूनिमोर तालुक्यातील सम्राट अशोक विद्यालय उमरीच्या 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने जिल्हा क्रीडाधिकारी गोंदिया च्या वतीने आयोजित शालेय क्रीडास्पर्धेतजिल्हा स्तरीय खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.आगामी  नागपूर विभागिय स्पर्धेत हा संघ गोंदिया जिल्ह्याचे नेतृत्व करेल.या यशाबद्दल संघातील खेळाडू स्नेहल तवाडे, साक्षी कापसे,शेजल वैद्य,साक्षी मेश्राम, दिव्या गोंधळे, किरण गुढेवार,पायल गुढेवार,यज्ञा येरणे, प्रणाली डडेमल,शुभांगी राऊत,तृप्ती डोये तसेच क्रीडा शिक्षक एच एस पात्रीकर,आर के खेडकर, एम एम साखरे यांचा  संस्था सचिव लेखानंद भैसारे, जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोने,मुख्याध्यापक सूर्यभान टेंम्भूरने,सावरटोल्याचे,सरपंच वैशाली राखडे,बोरटोला  सरपंच शेवंताबाई गुढेवार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा