बातमीपत्र

बाऊन्सर महिला पथक सोबत योग दिन साजरा

 

मुंबई- गुरीवारी झालेल्या चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त डॉ अनिल पाटील यांच्या वेदीक्युअर चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थेद्वारे मुंबईतील बाऊन्सर महिला पथक सोबत योग दिन साजरा करण्यात आला. यासोबतच वेदीक्युअर च्या महाराष्ट्रातील 16 क्लीनिक्स मध्ये मोफत वैद्यकीय शिबित ठेवण्यात आले होते. यावेळी महिलांना योगा चे प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कुंग फु विद्यार्थी देखील यावेळी उपस्थित होते.  

 योगा हा आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचा आहे याचे महत्व यावेळी महिलांना आणि कुंग फू विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे आसन संयुक्त उपचार तज्ज्ञांनी महिलांना शिकवले. या सोबतच या सामाजिक संस्थेद्वारे महाराष्ट्रातील एकूण 16 वेदीक्युअरच्या क्लीनिक् मधून मोफत वैद्यकीय शिबीर ठेऊन योग दिन साजरा करण्यात आला. या शिबिरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा