रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ सानप यांचा उमेदवारी अर्ज दाखल.रिसोड येथे भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ सानप यांनी शक्ती प्रदर्शन करित उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी त्यांच्या सोबत वाशिम यवतमाळ लोकसभेच्या खासदार भावना गवळी शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष सुरेश मापारी रिसोड तालुकाध्यक्ष महादेव ठाकरे व मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
