गारगोटी प्रतिनिधी- राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातून युवक नेते -जीवनदादा पाटील यांनी आज शुक्रवारी ४रोजी हजारो युवक, महीला व प्रचंड अशा जनसमुदाया उपस्थित वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून आपला भव्य अशी मोटार सायकल व फोर व्हिलर रँली काढत राधानगरी येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकारी संपत खिलारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
युवक नेते जीवन पाटील यांनी कुर पासुन राधानगरी तहसील कार्यालयापर्यंत या रॅलीचे नियोजन केले होते त्यामुळे सकाळ पासूनच मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन पक्षाचे व जीवन पाटील प्रेमी कार्यकर्ते, युवक, कुर येथे जमले होते. या रँली जवळ जवळ चार पाच किलोमीटर अशी विस्तृत होती. युवकांचा मोठ्या प्रमाणात या रॅलीमध्ये सहभाग दिसुन आला.या रँलीची सांगता जीवन पाटील यांनी अर्ज दाखल केल्यानंतर सभा घेऊन करण्यात आली.
यावेळी जीवन पाटील म्हणाले की आपण राधानगरी भुदरगड व आजरा या तिन्ही तालुक्यांच्या विकासावर भर देणार असुन हा मतदारसंघ एक विकासाचे वेगळे माँडेल बनवुन तुम्हाला दाखवेन.जीवन पाटील हा धनदांडगा किंवा मोठा नाही पण तो तुमच्यापैंकीच सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकरता आहे.त्यामुळे मला एकदा संधी द्या सधीचे सोने करुन सर्वसामान्यांचा आमदार कसा असतो हे सिद्ध करुन दाखवून देईन. तसेच या मतदार संघात रखडलेल्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करेन. व युवकांच्या बेरोजगाराचा प्रयन्त ही निकालात काढुन दाखवतो.त्यामुळे सर्वानीच असेच माझ्या पाठीशी राहून आपण या मतदार संघाला एक तुमच्या सर्वांचा हक्काचा आमदार देवुया असे ते म्हणाले. यावेळी राजाभाऊ शिरगुप्पे, पी. डी. पाटील, सरपंच अनिल हळदकर , हरिभाऊ कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली. या रँलीतुन जीवन पाटील मतदार संघातून आव्हान निर्माण करणार असेच दिसते. जीवन पाटील यांचा अर्ज दाखल प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य संघटक राजाभाऊ शिरगुप्पे, संग्राम सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य पी. डी. पाटील, शिवाजी पाटील, संकेत सावंत, हरिभाऊ कांबळे आदि सह प्रचंड अशा संकेत युवक व जनसमुदाय उपस्थित होता.
