बुलढाणा प्रतिनिधी ( पुरुषोत्तम बोर्डे ) बुलडाणा मतदार संघात बहुजन वंचित आघाडी ने अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या घटका बाकी असताना माजी आमदार विजयराज शिंदे यांना उमेदवारी देऊन सर्वच मातब्बरांना चांगलाच धक्का दिला आहे तर काही तासातच येथील राजकीय समीकरणे बदलली असून हि वंचित ची विजयी खेळी मानल्या जात आहे. काही दिवसापूर्वी आघाडीने घाटाखालील डॉ तेजल शरद काळे यांना उमेदवारी घोषित केली व त्या दरम्यान बुलढाणा येथे गर्दे हॉल मध्ये आदिवासी मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित होते त्यावेळी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून वंचित चा उमेदवार हा विधानसभेत पाठवा असे आवाहन बाळासाहेबांनी केले परंतु वंचित आघाडीचे व भारिप बहुजन महासंघाचे सर्वच पदाधिकारी यांनी आघाडीने दिलेल्या उमेदवारावर सविस्तर चर्चा करुण मतदारसंघातील सामाजिक समिकरण पाहता कार्यकर्त्यांचा कल जाणून घेतला याच काळात शिवसेना नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारली ते वंचित बहुजन आघाडी च्या प्रमुख नेत्यांच्या संपर्कात आले व त्यांनी आघाडीकडे वंचित बहुजन आघाडी च्या तिकिटावर लढण्यास तयारी दर्शवली आणि राजकीय घडामोडी सुरू झाल्या, त्यातच विजयराज शिंदे यांना वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी मिळविण्यात विजय मिळाला व या सर्व घडामोडींमुळे विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला व विजयराज शिंदे यांचा राजकीय प्रवास पाहता योग्य उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या गळाला लागल्याने आंबेडकरी जनतेमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे आज दिनांक 4 ऑक्टोबर रोजी त्यांनी प्रचंड रॅली काढून भव्य शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक भाऊ सोनवणे जिल्हाध्यक्ष जितेंद्र एन जैन भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू ऊबाळे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भिमराव तायडे जिल्हा संघटक प्रशांत वाघोदे,बाळा राऊत,मुन्ना बेडवाल, प्राध्यापक सुभाष लहाने,प्राचार्य गोविंद गायकी,मिलिंद वानखेडे,गणेश सोनुने यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
