राधानगरी तालुक्यातील आडोली येथील श्री.महालक्ष्मी माध्य.विद्यालय येथे कायदेविषयक साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी दिवाणी न्यायाधीश श्री.म.ह. शितोळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले उपस्थित सर्वांचे स्वागत मुख्यध्यापक व्ही.पी.पाटील यांनी केले.याप्रसंगी अँडव्होकेट आर.डी.खाडे,अँडव्होकेट यु.एम. मानकर,अँडव्होकेट जी.के.वागरे यांनी कायदेविषयक माहिती दिली.राधानगरी नेचर क्लबचे श्री. संदेश म्हापसेकर यांनी वन पर्यावरण,वन्यजीव व त्यांची सुरक्षितता या विषयी माहिती दिली.दिवाणी न्यायाधीश यांनी मानवाधिकार-हक्क आणि कर्तव्य या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला सरपंच शिवाजी पाटील,भरत पाटील,आनंदा सुतार,दत्ता ढोकरे,रवी जाधव,सौ. स्मिता कांबळे,डी.एन.पाटील,श्री. देशमुख व राधानगरी वनविभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.उपस्थित सर्वांचे आभार श्री. संपत मोहिते यांनी मानले.
