बातमीपत्र

गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, शहीद जवान योगेश दराडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व भीमा-कोरेगाव शौर्यदिनाचे औचित्य साधून लोणार तालुक्यातील बिबी येथे विनामूल्य भव्य आरोग्य, नेत्रतपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात साडेचारशे गोरगरीब रुग्णांनी आरोग्य व नेत्र तपासणी चा लाभ घेतला तसेच या शिबिरामध्ये ५९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
आरोग्य तपासणी शिबिरामध्ये डॉ सावन राठोड, डॉ नितिन राठोड, डॉ सचिन नरवाडे, डॉ अक्षय पाटील, डॉ विजय राठोड, डॉ संदेश राठोड, डॉ प्रशांत राठोड, डॉ संजय ठोकरे यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी केली. तपासणीनंतर रुग्णांसाठी औषधीचे मोफत वितरण सह्याद्री मेडिकल यांच्यावतीने करण्यात आले. या शिबीराचा लाभ घेतलेल्या प्रत्येक गोरगरीब रुग्णांनी आयोजकाचे आभार मानून   समाधान व्यक्त केले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा