स्वातीताई मोराळे सखी मंच व ओबीसी फौंडेशन इंडिया महिला आघाडी यांनी आपली संक्रात घोडगंगा साखर कारखान्यावर शिरूर जि. पुणे येथे जाऊन साजरी केली.मंचच्या वतीने गेली दोन वर्षे संक्रात कोपी वर जाऊन साजरी केली जाते.वाण व प्रत्येक महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.संत तुकाराम कारखाना, राजगड साखर कारखाना येथे जाऊन ही मंचच्या वतीने संक्रात साजरी केली. साड्या वाटणे यापेक्षा या महिलांना टॉयलेट, पाणी, मुलांना शाळा व भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. यासाठी सातत्याने ओबीसी फौंडेशन इंडिया प्रयत्नशील आहे. महिलांची आरोग्य तपासणी करणे व या वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा कोयता काढून घेण्यासाठी मी प्रयत्न करत आहे.स्वातीताई मोराळे सखी मंचच्या प्रदेशाध्यक्ष सविता बोरुडे, उपाध्यक्ष सुवर्णा सिरसाट, ओबीसी फौंडेशन इंडिया शिरूर तालुकाध्यक्ष सुजाता रासकर, देवदत्त उगले, वंदना पोटे जिल्हाध्यक्ष सोमनाथ रासकर, संदीप दहिफळे उपस्थित होते
