लोणार तालुक्यामध्ये अतिक्रमण काढण्याचे काम जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात आले परंतु लोणार येथील स्वतंत्र मैदान या ठिकाणी असलेले नगर अध्यक्षांच्या पतीचे भोजनालय त्याच्या भोवती असलेले अतिक्रमण हटवले नाही तरी ते अतिक्रमण हटवावे आशी मागणी लोणार येथील अविनाश मधुकर सरदार यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे एका निवेदना मार्फत केली.
तरी हे अतिक्रमण हटवले नाही त्यामुळे लोणार येथील अविनाश सरदार यांनी नगर परिषद लोणार येथील मैदानावर आमरण उपोषण सुरु केले आहे अविनाश सरदार यांच्या मागण्या आहे की
१) नगर आध्यकक्ष पतीने शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण काढावे.
२) ५०० मिटर मध्ये वैयक्तिक स्वच्छालय करता अनुदान देणे
3) वार्ड क्रमांक ५ मध्ये महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छालय बांधणे
४) स्वातंत्र्य मैदानामध्ये चहा भेळ फ्रुट फेरीवाले यांच्यासाठी 10 बाय 10 जागा निश्चित करुण लिजवर द्यावे आशा अविनाश सरदार यांची मागणी आहे
