लोणार सरोवर परिसरासह कोयाळी, कारेगाव, सोमठाणा, पिंपळखुटा, सारस्वती या गाव शिवारात मागील काही महिन्यापासून दहशत असणारा बिबट्या आज दिनांक 6 फेब्रुवारी रोजी लोणार - किनगाव जट्टू रोडवरील किन्ही येथील शेतकऱ्याने शेतीच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळीत त्याचा पाय गुंतल्याने तो त्यामध्ये अडकल्याची घटना घडली आहे. ही बातमी परिसरातील नागरिकांना कळताच बघ्यांनी एकच गर्दी केली.लोणार सरोवर परिसराचे क्षेत्र अशा हिंस्र प्राण्यांसाठी पुरेसे नाही. त्यामुळे अशा प्राण्यांचे पुनर्वसन इतर ठिकाणी करण्याची मागणी गरीकांकडून होत आहे.
