बातमीपत्र

खेडगाव महोत्सव (युथ फेस्टिवल) २०२०,मराठी चित्रपट " वेडापिसा " चे प्रमोशन जोरदार

दि.07 फेब्रुवारी 2020 रोजी मा.श्री.दत्तात्रयजी पाटील कला क्रिडा व सांस्कृतिक बहुउद्देशिय संस्था खेडगाव ता. दिंडोरी जि.नासिक आयोजित युथ फेस्टिवल मध्ये श्री.भगवान गि.देवकर(अभिनेता /निर्माता/दिग्दर्शक) यांना " खेडगाव भुषण " या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वेळी उपस्थित मान्यवर श्री.श्रीरामजी शेटे,श्री.दत्तात्रय पाटील,अनिल दादा ठुबे व संस्थेचे पदाधिकारी व आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच खेडगाव व खेडगाव पंचक्रोशीतील हजारो लोक उपस्थित होते,या कार्यक्रमात गावातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आपली कला सादर केली.सोबतच मराठी चित्रपट " वेडापिसा " चे दिग्दर्शक श्री.भगवान देवकर व कलाकार श्री.मिलिंद चिखलिकर(अभिनेता),मा.श्री.राजेंद्र काळे (अभिनेता व प्रसिद्ध भारूड सम्राट),श्री.देवेंद्र वाघ सर (अथर्व क्रियेशन),श्री.योगेश गोसावी (अभिनेता ,दिग्दर्शक व पत्रकार महासंघाचे प्रेस मिडिया जिल्हा अध्यक्ष नाशिक) रूद्रायोगी( D.O. P.) जयेश शर्मा (अभिनेता ),उषा भ.देवकर(अभिनेत्री),पार्थ भ.देवकर(अभिनेता),मानसी चौधरी(अभिनेत्री),दिपाली सानप (अभिनेत्री) यांनी ही कार्यक्रमात हजेरी लावून मराठी चित्रपट " वेडापिसा " चे प्रमोशन जोरदारपणे केले.या वेळी पार्थ देवकर यांनी आपली अभिनयाची चुणूक दाखवून प्रेक्षकांची अक्षरशः मने जिंकली.शेवटी भगवान देवकर अभिनेता दिग्दर्शक वेडापिसा यांनी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर आणि मित्रपरिवार व प्रेक्षकांचे धन्यवाद मानले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा