बातमीपत्र

लोणार तालुका भाजपाचे वतीने भाजपा ता.अध्यक्ष ऍड.शिवाजी सानप यांच्या नेतृत्वात लोणार तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन मा.तहसीलदार यांना आघाडी सरकारच्या विरोधात निवेदन देण्यात आले.सदर निवेदनात आघाडी सरकार कडून शेतकर्याची होत असलेली फसवणुक,महिलांवर वाढत चाललेले अत्याचार,२५ हजार हेक्टरी मदत शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे असे निवेदनात नमुद करण्यात आले होते.यावेळी बाबारावजी मुंढे,अविनाश शुक्ला,सुंदर संचेती,भगवान सानप,संजय बुरकूल,विजय मापारी,प्रकाश नागरे,गजानन मापारी,जगन खोलगडे,गणेश तांगडे,सुरेश अंभोरे,देवानंद सानप व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा