परतूर तालुक्यातील आष्टीसर्कल मधील सोपारा वाहेगाव येथील स्वाती जगताप व त्यांचे नातेवाईक रात्री दहा सुमारास आष्टी येथील आरोग्य केंद्रात स्वाती जगताप यांना गर्भावस्थेत त्रास होत असताना तपासणी करण्याकरिता आष्टी येथील आरोग्य केंद्रात घेऊन गेले असता डॉक्टरांनी जगताप कुटुंबाना आपल्या गर्भवती मुलीच्या पोटातील बाळ मृत झाल्याचे सांगितले असे सांगताच नातेवाईकांना धक्का बसला त्यानंतर महिलेचे प्राण वाचवायचे असतील तर बाळाला बाहेर काढावे लागेल असे करण्या करीता शहरातील डॉक्टरांकडून ट्रेटमेंट घ्यावी लागणार असेही सांगण्यात आले.सदर कुटुंबीय आपल्या मुलीला घेऊन गाडीने दुसऱ्या रूग्णालयात जात असतांना रस्त्यातच महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सध्या महिलेची आणि बाळाची प्रकृती उत्तम आहे.घडलेल्या प्रकारावर महिलेच्या नातेवाईकांनी हलगर्जीपणा करणाऱ्या वर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Live Maharashtra हे चॅनेल आपल्या महाराष्ट्रातील खरी परिस्थिती जनता व शासना पर्यंत पोहचवण्याचे कार्य करत आहे. तरी मी पाठवलेल्या लिंक वर न्युज पाहून झाल्यावर खाली असलेले subscribe हे बटन दाबा जेणेकरून पुढील सर्व न्युज आपल्याला पाहता येईल व आपल्या ठीकाणी कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास आम्हाला कळवा आम्ही ती आमच्या न्युज चॅनेल वर नक्की दाखवु. ।। हाक तुमची साथ आमची ।। धन्यवाद आपला मित्र अनिल राजाराम कांबळे C.E.O.