प्रतिनिधी - भांडुपकरांची बेड अभावी होत असलेली गैरसोय मुंबई जिल्हा सहकारी हाऊसिंग फेडरेशनचे संचालक श्री विशाल कडणे यांनी महापालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यावर महापालिकेची चक्रे जलद गतीने फिरत आहेत. अतिरिक्त आयुक्त पूर्व उपनगरे यांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. फक्त भांडुपमध्येच नाही तर मुलुंड मध्ये देखील कुठे हॉस्पिटलमध्ये भांडुपच्या रुग्णाची सोय करता येईल का याबाबत प्रशासन प्रयत्नशील असून अधिकाधिक बेड उपलब्धता त्वरित करणेसाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होत आहेत. सदर विषयामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि कोविड योद्ध्यांनी बेड कमतरतेबाबत विशाल कडणे यांच्याकडे कैफियत मांडली होती. सदर विषयास तातडीने प्रशासनाकडे मांडून शक्य तितक्या लवकरात लवकर भांडुपकराना हक्काचे कोविड रुग्णालय मिळावे यासाठी अनेक वेगवेगळ्या स्तरावर पाठपुरावा चालू आहे. भांडुप विभागामध्ये कोरोनाला संपविण्यासाठी महापालिका एस विभाग आणि सर्वच प्रशासकीय यंत्रणा अपार मेहनत घेत आहेत. त्याचबरोबर कोविड योद्धे, सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी जीवापाड प्रयत्न करत आहेत. त्याच जोडीला भांडुपकरांना देखील भांडुप मुलुंडमध्ये जर जवळपास कोविड स्पेशल इस्पितळ मिळाले तर ह्या कोविडविरुद्धच्या लढाईत खुप महत्वाची मदत होईल. अशी मागणी विशाल कडणे यांनी केली आहे
