बातमीपत्र

झोटींगा तालुका सिंदखेड राजा येथील रामेश्वर मुकिंदा वाघ येथील 34 वर्षे वयाच्या तरुणाला विष पिलेल्या अवस्थेत त्याचे नातेवाईक दिलीप मुकिंदा वाघ यांनी बिबी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले होते.सदर पेशंटवर डॉक्टर ने स्वतः पेशंटच्या नाकात विष काढण्यासाठी नळी टाकून उपचार सुरू केले व विष काढण्याची प्रक्रिया चालू होती.रुग्णाला कोण कोणती औषधे द्यायची याची खुर्चीवर बसून आर्डर देत असताना झोटिंगा गावाचे सरपंच डिघोळे हे आत आले व डॉक्टरांसोबत सोबत हुज्जत घालून शिवीगाळ करू लागले यावेळी सफाई कर्मचारी प्रमीला प्रेम धंडोरे यांनी सरपंच डिघोळे यांना शांत राहण्यास सांगितल्याने ते त्यांच्या अंगावर धावून गेले. पुढील उपचाराकरिता जालना येथील दवाखान्यात घेऊनजाण्यास नकार दिल्याने व हाणामारीकरणाऱ्या विरुद्ध डॉ. अक्षय जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीबी पोलीस स्टेशन मध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास ठाणेदार एल डी तावरे स्वतः करीत आहोत.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा