बातमीपत्र

खळेगाव हे लोणार तालुक्यांतील गाव असून गेल्या २४ तासात कोरोनाचे ४ बाधित रुग्ण आढलून आले असून 23 जनची कोरोना चाचनी करण्यात आली आहे १५ ते २० जनाची कोरोना चाचणी करण्याची बाकी असून त्या मध्ये ज्यांची चाचणी निगेटिव्ह आली नियमाने त्याना 14 दिवस होमकॉरंटाईन केले पाहिजे होते परंतु हे रुग्णाचे नातेवाईक व संबंधित व्यक्ती बेजबाबदारपणे गावामध्ये फिरत आहेत त्या मूळे गावाला मोठा धोका निर्माण होण्याची शकता नाकारता येत नाही. तसेच या सर्व व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी व मंदिरे येथे जबरदस्तीने हजर होतात.त्यामुळे संपूर्ण गावाला कोरोनाची लागण होण्यास जास्त वेळ लागणार नाही अशी गावकऱ्यांची रोषाची भावना निर्माण होत आहे.त्यामुळे जर येत्या ४ तासाच्या आत यांना होमकॉरंटाईन केलं नाही तर प्रशासनाला गंभीर स्वरूपाच्या प्रकराला सामोरे जावे लागेल असे मत खळेगाव येथिल सामजिक कार्यकर्ते श्री.शिवाजी देवराव नागरे यांनी माध्यमांच्या स्थानिक प्रतिनिधिसोबत बोलताना व्यक्त केले. 


आमच्यात सामील व्हा