बातमीपत्र

बुलढाणा जिल्यातील मेहकर तालुक्यामध्ये घाटबोरी येथे अवैध दारू मुळे अनेक संसार उध्वस्त झाले,दारु च्या व्यसनाने अनेकांच्या संसारात भांडन-तंटे वाढून संसारात तेढ निर्माण झाली होती.तसेच गावातील तरुण मुले सुद्धा दारुच्या व्यसनाच्या आहारी जात असताना कंटाळून रक्षाबंधन या पवित्र सनाच्या दिवशी बहिण बेबीताई पांडुरंग जाधव व सुनिता रमेश काळे या दोघींनी आपला भाऊ प्रकाशचा अवैध दारु विक्रीचा व्यवसाय गावातील महिलांना  एकत्र करुन,सरपंच गजानन चनेवार यांच्या सहकार्याने आपल्या भावाचा अवैध दारू व्यवसाय उध्दवस्त करुन,भावाला राखी बांधायच्या ऐवजी सरपंच,पोलीस पाटील,पत्रकार,तटांमुक्ती अध्यक्ष यांना भाऊ समजुन राखी बांधली,त्यामुळे या नारीशक्तिचे जिल्हात कौतुक होत आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा