पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या सर्वांगिक विकासासाठी समृद्धी महामार्गाची योजना आमलात आणून जनतेचा विकास कसा साधला जाईल यासाठी हा महामार्ग सुरु केला पण अशातच या बेजबाबदार प्रशासनाच्या कामामुळे व ठेकेदाराच्या दादागिरीमुळे लोणार तालुक्यातील खळेगाव येथून हा महामार्ग जात असून येथील गट क्रमांक २७६ या जमिनीवर शासनाने ४० ते ४५ वर्षांपूर्वी लाखोरुपये खर्च करून (सालदार ) नामक पाझरतलाव तयार केला हा तलाव गावातील पहिला पाझरतलाव असून आता त्या तलावात ठेकेदाराने रस्त्याच्या कामातील उरलेली मुरूम माती व कचरा टाकल्याने हा तलाव ४० ते ५० फूट तलाव दाबला गेला.त्यामुळे या परिसरातील गुरांचा पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे याकडे शासनाने लक्षदेउं ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला.
