खळेगाव हे लोणार तालुक्यातील ५ हजार लोक संख्येचे गाव असून येथे सर्व जाती धर्माचे लोक राहतात परंतु गावाचा विकास हा स्वातंत्र्य मिळाल्यापासून झाला नसल्याचे पाहून गावातील अनेक समस्या जनतेला त्रस्त करीत असल्याने गावातच नव्हे तर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्री बबनराव नागरे यांनी गाव पंचायत बिनविरोध करण्याची संकल्पना गावकऱ्यांच्या समोर मांडली ती गावकऱयांनी एकमताने मंजूर केली पण गावातील असंतुष्ट पार्टीचालकांनी त्यांना सहकार्य न करता आपण काय आहोत असे दाखवून दिले पण जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल अशी भावना गावकरी तवा बबनराव नागरे यांनी व्यक्त केली भागवत चव्हाण लोणार
