दिनांक २५ मार्च २०२१ रोजी रात्रौ ११.३० वाजताच्या सुमारास ड्रीम्स मॉल भांडूप(प.) येथे सनराईझ हॉस्पिटलमध्ये आग लागली.घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे १४-फायर वाहन,१०-जम्बो वॉटर टँकर,१०-रुग्णवाहिका,०१-टी. टी.एल.व ०१- बी.ए.वाहन उपस्थित होते.सदरची आग लेवल-४ ची असून अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न सदरच्या आगीवरती नियंत्रण मिळवीले आहे.सनराईस हॉस्पिटलमधील सर्व रुग्णांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले असून सदर घटनेत ११ रुग्णांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला आहे.तसेच ५ रुग्ण किरकोळ जखमी झाले असून,त्यातील २-रुग्णांना वीराज हॉस्पिटल,ठाणे व ३-रुग्णांना मे.फोर्टिस हॉस्पिटल,मुलूंड येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अशी मुंबई आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून माहिती मिळाली. या आगीत मृत झालेल्या रूग्णांची माहिती पुढीप्रमाणे १) श्री. निसार जावेद चंद्र (पु/ वय:- ७४ वर्ष)२) श्री. गोविंदलाल दास (पु/ वय :- ८० वर्ष) ३) श्री. रवींद्र मुणगेकर (पु/ वय:-६६ वर्ष)४) श्रीमती. मंजुळा बथारिया (स्त्री/ वय:-६५ वर्ष) ५) श्री. अंबाजी पाटील (पु/ वय:-६५ वर्ष)६) श्री. सुधीर लाड (पु/ वय:-६६ वर्ष) ७) श्रीमती. सुनंदाबाई पाटील (स्त्री/ वय:-५८ वर्ष)८) श्री. हरीप सचदेव (पु/ वय:-६८ वर्ष) ९) श्री. श्याम भक्तीलाल (पु./ वय:-७७ वर्ष)१०) श्री. महादेव शंकर अय्यर (पु./ वय:- ७९ वर्ष) ११) श्री. अशोक श्रीपाद वाघमारे (पु./ वय:-३८ वर्ष) जखमी झालेल्या रुग्णांची माहिती पुढीप्रमाणे १) श्री. चेतनदास गोडवाणी (पु/ वय:- ७८ वर्ष)२) श्रीमती. माधुरी गोडवाणी (स्त्री/ वय:- ६८ वर्ष) ३) श्री. गिरीश मेमौन (पु/ वय:-४३ वर्ष)४) श्री. कुलदीप मेहता (पु/ वय:-४८ वर्ष) ५) श्री. पुष्पक दरे (पु/ वय:-६५ वर्ष) सनराईस हॉस्पिटल मधील इतर ३० रुग्णांना मुलुंड जम्बो कोविड हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. सदरची आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक जवान प्रयत्न करीत आहेत.
