बातमीपत्र

भांडुप येथील सनराईज हॉस्पिटल मधील आगीत निष्पाप १२ जणांचे बळी गेले.मनसेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन रुग्णालयासह ड्रीम्स मॉलच्या परिस्थितीची पाहणी केली. बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,हे मस्तवाल सरकार,बेहाल जनता अशा टिकेने सुरुवात करत भंडाऱ्यातीळ जळीत कांडची पुनरावृत्ती झाल्याचे सांगितले अशा घटना घडत असतात आपण काही दिवसांनी ती घटना विसरतो.या घटनेनंतर शासनाचे डोळे उघडणार आहेत का?संबंधित ड्रीम्स मॉल प्रशासन, सनराईज रूग्णालयावर कारवाई झालीच पाहिजे,त्याचबरोबर मनपा आयुक्त,अग्निशमन दलाच्या विभागाचे अधिकारी,एस विभागाचे सहाय्यक आयुक्त व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी असेही बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.ईशान्य मुंबईचे माजी खासदार संजय पाटील यांनी मनसेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर यांची भेट घेतली.या दुर्दैवी घटनेत सर्व पक्षांनी एकत्र येऊन रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी मदतीला धावून आले व काम केले हि खूप समाधानकारक बाब असल्याचे मत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा