कालीमाता मंदिर रोड येथे सुरु असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामामुळे कोकण नगर विभागातील काही सोसायटीचा पाणीपुरवठा खंडित झाला होता विभागात जलवाहिन्या फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी समस्येला सामोरे जावे लागले.होळी व धुळवडीत कोकण नगरात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता पालिकेच्या बेशिस्त व हलगर्जीपणामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरेजावे लागले.नागरिकांनची गैरसोय होऊ नये यासाठी अमित भोगले यांनी स्वखर्चाने शुद्ध पाणी टॅकरच्या सहाय्याने नागरिकांना तात्काळ उपलब्ध करून दिल्याने स्थानिकांनी समाजसेवक अमित भोगले यांचे आभार मानले.
