भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोणार तालुक्यात व शहरात ठिकठिकाणी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आपल्या घरावर भारतीय जनता पक्षाचा ध्वज लावुन भाजप स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.स्थापना दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बाबारावजी मुंडे,शहराध्यक्ष गजानन मापारी,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष उद्धव आटोळे,किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मारुतराव सुरुशे,जिल्हा सदस्य शिवाजी सानप जिल्हा सचिव व नेते विजय भाऊ मापारी,भगवानराव सानप,प्रकाश महाराज मुंडे तालुका सरचिटणीस प्रकाश नागरे,गणेश तांगडे तालुका उपाध्यक्ष संजय बुरुकुल,सुरेश आंभोरे,विनोद थोरवे,विष्णू डोळे,दिनकर डोळे,जगन खोलगडे, एकनाथ टेकाळे,कैलास शिंदे,विजय पाडघान,अशोक मुंडे व इतर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या घरवर ध्वज लावून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
