नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 24 रूग्णांचा मृत्यू झाला, तर विरारमधील रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे 13 करुणा रूग्णांचा मृत्यू झाला. मध्यरात्रीनंतर विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागली. यामध्ये 13 करोणा संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त घटनास्थळी हजर नव्हते. केवळ स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाने इतर रुग्णांना दुसर्या रूग्णालयात हलवले. मृतांमध्ये पाच महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे. केंद्र सरकारकडून 2 लाख रुपये, महाराष्ट्र शासनाकडून 5 लाख रुपये, महानगरपालिकेकडून 5 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये देण्यात येतील, यावेळी रूग्णालयातील मंत्री पाहणी करन्या करिता आले, मंत्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालघरचे पालकमंत्री दादासाहेब भुसे, मंत्री जितेंद्र आव्हाड, विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, पालघर जिल्हा खासदार राजेंद्र गावित, स्थानिक वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर यांच्यासह अन्य अधिकारी यांनी रुग्णालयात पाहणी केली
