बातमीपत्र

खापरखेड घुले येथील पंडित राठोड यांच्या राहत्या घराला दुपारच्या दरम्यान आग लागली सदर आगीमध्ये घरातील अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली असून रोख रक्कम २५ हजार रुपये आगी मध्ये जळून गेले.u त्यांच्या दारासमोर अभ्या असलेल्या दोन मोटरसायकली सुद्धा या आगीत जळून खाक झाल्या.सदर आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही परंतु लागलेल्या आगीमध्ये अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच तलाठी एम.बी.सरदार हे घटनास्थळी दाखल झाले व सदर घटनेचा पंचनामा करून अहवाल तहसीलदार यांना पाठवला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप राठोड, अंकुश डोंगरे,भिवा हरणे, समाधान निखाडे उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा