बातमीपत्र

लोणार येथे दुचाकी चोरीच्या तीन तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल होत्या पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी पोलिस पथक तयार करून दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथकास आदेश दिला पोलिस पथकाने २६ मे रोजी गुन्ह्यात प्राप्त सीसीटीव्ही वर्णांनाचा मुलगा हा पोहेका सुरेश काळे यांना आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने वरील गुन्ह्य़ाची कबुली देत स्वतः चे नाव हरीश खान नसीर खान राहणार लोणार असे सांगितले.दुचाकी चोरी बाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातील व आरोपीने विकलेल्या इसमांच्या ताब्यातील एकूण अकरा दुचाकी किंमत एक लाख पंधरा हजार रु चा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी आरोपीं हरीष खान सह सहा जणांना अटक करून गुन्हा दाखल केला.सदर कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया,अपर पोलिस अधीक्षक बजरंग बनसोडे,मेहकर उपविभागिय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख,पोलिस उपनिरीक्षक भारत बर्डे, पोहेका सुरेश काळे,पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा निकम,चंद्रशेखर मुरडकर,किशोर बोरे,कृष्णा निकम,तेजराव भोकरे यांनी पार पाडून आरोपींना अटक केली पुढील तपास लोणार पोलीस करीत आहेत.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा