महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भांडूप विधानसभा राजगड शाखा 110 च्या वतीने शाखाध्यक्ष मोहन चिराथ यांच्या मार्गदर्शनाखाली 12 व 13 जून 2021 रोजी "भव्य फुटबॉल स्पर्धेचे" आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत एकूण नामवंत 32 संघांचा सहभाग असून प्रथम पारितोषिक 22222 रुपये रोख व सन्मान चिन्ह,द्वितीय पारितोषिक 11,111 रोख सन्मानचिन्ह, सर्वोत्कृष्ट गोलरक्षकास 2222 रोख, आणि सन्मानचिन्ह आणि या सामन्यातून सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरणाऱ्या खेळाडूला 2222 रुपये आणि सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. प्रत्येक सामन्यातून एक सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडण्यात येणार असून सदर खेळाडूला आकर्षक टी-शर्ट प्रधान करण्यात येणार आहे. 12जुन व 13 जून रोजी सामने ठिक वेळेवर सुरू होतील याची संबंधित संघनायक व व्यवस्थापकांनी याची नोंद घ्यावी. व आपला संघ मैदानात उपस्थित होण्यापूर्वी राजगड शाखा 110 कार्यालयात आपण आल्याची नोंद देणे गरजेचे आहे असेही आवाहन शाखाध्यक्ष मोहन चिराथ यांनी केले आहे.
