बातमीपत्र

अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२१ रोजी सेन्ट जेम्स इंग्लिश मेडियम स्कूल, कुंभारवाडा येथे लायन्स व लिओ क्लब ऑफ आगाशी तर्फे जीवनदान देणाऱ्या रक्तदान शिबिराचे आयोजन करून देशहिताचा उपक्रम राबवण्यात आला.आगाशी व संबंधित परिसरातील संस्था तसेच आगाशी ब्लड डोनेशन गृप व वैयक्तिक रित्या रक्तदात्यांनी सहभागी होऊन २०८ बाटल्यांची विक्रमी अशी नोंद केली. लायन्स क्लब ऑफ आगाशी चे अध्यक्ष,लिओ क्लब ऑफ आगाशी चे अध्यक्ष,आजी माजी पदाधिकारी सर्व क्लब सभासद तसेच प्रभाकर वागळे व मित्रमंडळ च्या सहकार्याने रक्तदान शिबीर यशस्वी करण्यात आले.लायन्स क्लब मुंबईचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन डॉक्टर ख्वाजा मुदतस्सीर तसेच प्रथम उप गव्हर्नर लायन हेमांतराज सेठीया व द्वितीय उप गव्हर्नर लायन अजय हवेलीया आणि ग्लोबल सर्व्हिस टीम चे प्रमुख लायन मनोज बाबूर हे मान्यवर स्वतः शिबिरास उपस्थित राहिले व त्यान्नि लायन्स व लिओ क्लब आगाशी च्या सर्व रक्तदात्यांचे, सहकारी मित्रमंडळाचे आणि डिस्ट्रिक्ट टीम चे अभिनंदन व आभार व्यक्त केले.


साप्ताहिक बातम्या