बातमीपत्र

प्रदेश काँग्रेसने प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहचवणे, पक्ष संघटना बळकट करणे, नवीन मतदार नोंदणी आणि तळागाळात बूथ कमिट्या स्थापन करण्याकामी चर्चा करण्यासाठी काँग्रेस भवन, वसई येथे बैठकीचे आयोजन केले होते. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने बैठक आयोजित केली.राज्याचे विधिमंडळ सदस्य तथा काँग्रेस किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे, पुंडलिक जाधव व पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस विजय पाटील व वसई विरार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांनी उपस्थित राहून कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने बूथ कमित्य स्थापन करण्यावर त्यांनी भर दिला. एकला चलो रे चा नारा बुलंद केला आहे. कोरोना काळात भरीव व उत्तम कामगिरी केल्याबद्दल डॉ. आदिक शेख यांचा सत्कार करण्यात आला. काही पदाधिकाऱ्यांच्या नेमणूक करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.सर्व चार ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष, सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा