जिल्हा युवक काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस तथा केंद्रीय जिल्हा समितीचे समन्वयक मुकुल गुप्ता यांनी वसई विरार जिल्हा काँग्रेसचे मुख्यालय काँग्रेस भवन येथे भेट देऊन युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवा जिल्हाध्यक्ष कुलदीप वर्तक, माजी जिल्हा युवा अध्यक्ष संजय मीना, इंटकचे वसई तालुका अध्यक्ष किरण शिंदे, क्रिस्टल नाडर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
