लोणार नगरपरिषद च्या वतीने लसीकरण जनजागृती साठी अनोखा उपक्रम "राम नाम सत्य है लसीकरण से ही कोरोना का अंत है"या नाऱ्या सह अंत्ययात्रा काढण्यात आली जगातील काही देशात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढल्याने कोरोना ला दूर करण्यासाठी संपूर्ण लसीकरण करणे गरजेचे आहे.त्यामुळे प्रशासनाने 100% लसीकरण उद्दिष्ट करण्यासाठी सर्व यंत्रणेसह प्रशासन कामाकरिता समोर आले आहे.आज लोणार नगरपरिषद च्या वतीने लसीकरण जनजागृती साठी अनोखा उपक्रम "राम नाम सत्य है लसीकरण से ही कोरोना का अंत है"या नाऱ्या सह अंत्ययात्रा काढण्यात आली.व नागरिकांना नगर पालिकेने लसीकरण करण्याचे आव्हान केले.यावेळी लोणार तहसील चे तहसीलदार सैपन नदाफ, नगरपरिषद मुख्याधिकारी विठ्ठल केदारे,वैद्यकीय अधीक्षक फिरोज शहा,नगराध्यक्षा पुनम पाटोळे, उपाध्यक्ष बादशाह खान, आरोग्य सभापती फरजाना बी शे रउप,नगरसेवक संतोष मापारी,नगरसेवक डॉक्टर अनिल मापारी,नगरसेवक कंकाळ सर,नगरसेवक रमजान परसुवाले,माजी जिल्हा सरचिटणीस साहेबराव पाटोळे,तलाठी सचिन शेवाळे, प्रदीप संचेती, एम.ए.नसीम,कर्मचारी फुलचंद व्यास,अशोक निचग, कैलास मदनकर,शेख रफिक कुरेशी नगरपरिषदचे सर्व नगरसेवक नगरपरिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
