बातमीपत्र

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंजनी खुर्द येथे सावित्री-जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. त्यामध्ये निबंध स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा परिसंवाद तसेच आज दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले गेले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य सन्माननीय बावस्कर सर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय नाईक सर उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक वृंद शिक्षिका शिक्षकेतर व कर्मचारी यांनीदेखील प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहली या कार्यक्रमासाठी सर्वांनीच खूप मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पवार सर यांनी केले तर आभारप्रदर्शन प्राध्यापक समाधान गिरी यांनी केले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा