बातमीपत्र

भांडुप पश्चिम येथील सुरेंद्र उर्फ राजन गावडे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह मनसेत जाहीर प्रवेश

मनसेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्याची जय्यत तयारी करून महापालिका ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना केली  जात असतानाच, भांडुप मधील निष्ठावंत समाजसेवक व उद्योजक श्री. सुरेंद्र उर्फ राजन काशिराम गावडे यांनी काँग्रेसला मोठा धक्का देत असंख्य कार्यकर्त्यां समवेत राजगड ,दादर येथे युवा नेते अमित राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. 
या प्रसंगी विभाग प्रमुख संदीप जळगावकर, मा.नगरसेविका अनिषा माजगावकर ,  मनसे उपाध्यक्ष योगेश सावंत , उपविभाग अध्यक्ष नंदकुमार घोगळे,सुजय धुरत,शाखाध्यक्ष.दिलिप गुरव, यतिन सावंत,परेश तोरसकर, स्वप्निल तावडे,  महिला शाखाध्यक्षा सुप्रिया धुरत, कोमल राऊळ, भांडुप विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भांडुप पश्चिम येथील टेंबेपाडा व सर्वोदय नगरातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्याचा सहभाग होता.
 राजन गावडे यांचा अमित ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत  सर्वांनी मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला .

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे  यांनी विभाग प्रमुख संदीप जळगावकर यांच्या उपस्थितीत प्रवेश देण्याचे निश्चित केले होते.परंतू आपल्या उद्योग समूहाची संपूर्ण जबाबदारी  गावडे यांच्या कडे असल्यामुळे पक्ष प्रवेश  थोडा लांबला गेला. 
प्रवेश करणाऱ्यांमध्ये काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे राजन गावडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा