बातमीपत्र

लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील वेणी रोड वरील जंक्शनचे काम पूर्ण करण्यासाठी व गल्लीतील रॅम्प अपोर्च रोड करण्यासाठी गावकऱ्यांच्या वतीने रिकाम्या खुर्चीला देण्यात आलेले निवेदन निवेदन देण्यासाठी गावकरी एम. एस.आर.डी.सी.कार्यालय मेहकर येथे गेले आसता कार्यालयामध्ये अधिकारी निवेदन घेण्यासाठी हजर नव्हते. गेल्या चार ते पाच वर्षापासून सुरू असलेले शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. अनेक वेळा तोंडी तसेच लेखी निवेदन देऊनही सुद्धा सुलतानपूर येथे वेणी रोडवरील जंक्शनकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.सन २०२१ च्या पावसाळ्यामध्ये जंक्शन लगत असलेल्या नागरिकांच्या घरामध्ये अपूर्ण कामामुळे पुराचे पाणी घुसले.त्यामध्ये आर्थिक नुकसान होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले. यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये सुद्धा वेणी रोड हा चिखलमय होऊन अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत.जंक्शन लगत असलेल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत.तरी अपूर्ण काम त्वरित पूर्ण करावे अन्यथा जंक्शच्या नागरिकासह सामूहिकरित्या आत्मदहन करण्यात येईल असा इशारा निवेदन करत्यांनी दिलेला आहे.निवेदन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते संगपाल पनाड,अनित्य घेवंदे,मारोतराव सुरोशे,संतोषराव शिंदे,जाकीर खान,भागवत चव्हाण,शेख अत्तर,शेख कवसर,अन्सार शेख अहमदलाल आणि गावकरी हजर होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा