लोणार येथील भारतीय स्टेट बँक मध्ये नागरिकांना केवायसी करण्यासाठी विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांना केवायसी साठी वारंवार बँक मध्ये चक्रा माराव्या लागत आहे.यामुळे नागरिकांची आर्थिक व मानसिक नुकसान होत शेतीचे कामे सोडून शेतकरी वर्गाला बँक मध्ये केवायसी साठी खेपा माराव्या लागत असल्याने व बँकेचे एटीएम सुद्धा बंद राहत असल्याने या सर्व बाबींची दखल घेऊन दिनांक २६ जुलै २०२२ रोजी सामाजिक कार्यकर्ते विनायक भाऊ मापारी,अनंता शिंदे,दीपक नालेगावकर,शंकर गायकवाड,अंकुश काकडे, दत्ता घाटे यांनी शंभर ग्राहकांच्या सह्या घेऊन शाखा व्यवस्थापक यांना निवेदन दिले खातेदारांना त्रास होणार नाही यासाठी अतिरिक्त काउंटर उघडून ग्राहकांची कामे वेळेवर करण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले आहे अन्यथा सर्व ग्राहकांच्या उपस्थित अमरण उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विनायक भाऊ मापारी यांनी दिला.