भारत देशाला स्वतंत्र मिळून ७५ वर्ष पूर्णहोत आहेत त्या निमित्ताने शासन प्रशासनाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या भव्य दिव्या स्वरूपात साजरा करून प्रत्येक नागरिकांनी १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवायला आहे असे आवाहान शासनाने केले आहे. यानिमित्ताने जिल्हा परिषद शाळेतून तिरंगा रॅली काढून संपूर्ण गावातून जनजागृती करण्यात आले शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी भारत माता कि जय अशा घोषणा देऊन हार घर तिरंगा हार मन मे तिरंगा असे सांगत प्रभात फेरी काढण्यात आली.यावेळी शाळा समिती अध्यक्ष मलता गजानन केंधळे उपाध्यक्ष गजानन कचरू इंगळे,ग्रामपंचायत सचिव काळे साहेब,सरपंच विठोबा गुंगे,सदस्य गणेश चव्हाण आसाराम गायकवाड,संतोष चव्हाण अंगणवाडी सेविका व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.मुख्याध्यापक गायकवाड सर चव्हाण सर घुगे सर सिल्लोडे सर कांगणे सर गायकवाड सर यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.शेवटी राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.
